Advertisement
दोन मजुरांना उडवलं एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
मुंबई : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या कार अपघातात उर्मिलाच्या कारनं दोन मजुरांना उडवल्याचं म्हटलं जात आहे. तर एकाच मृत्य झाल्या असून दुसरा गंभीर जखमी असल्याचं म्हटलं जात आहे. या अपघातात उर्मिला आणि ड्रायव्हरला देखील दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. उर्मिला कोठारे ही यावेळी शूटिंग संपवून घरी परतत होती. त्याचवेळी हा अपघात झाला आहे. या अपघातात तिनं मुंबईचा कांदिवली पश्चिमच्या पोईसर मेट्रो परिसरात मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं आहे. उर्मिलाची कार ही वेगात होती. कारचा वेग जास्त असल्याने ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि हा रस्त्याच्या कडेला काम करत असणाऱ्या या मजुरांना धडक दिली आहे.