Advertisement
मुंबई : महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. विधानसभेची पुनरावृत्ती बीएमसी निवडणुकीत होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरे लागले आहेत. उद्धव ठाकरेंकडे असलेल्या माजी नगरसेवकांपैकी जवळपास 35 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. त्यामुळे आहेत त्या नगरसेवकांना पुन्हा निवडून आणणं आणि एकनाथ शिंदेकडे गेलेल्या नगरसेवकांना पर्याय देऊन त्या ठिकाणी विजय मिळवण्याचं आव्हान सध्या उद्धव ठाकरेंसमोर आहे.
विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या काही जागा राखण्यात उद्धव ठाकरेंना यश आलं आहे. त्या जोरावर बीएमसी निवडणुकीसाठी मशागत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. उद्धव ठाकरेंनी बीएमसी निवडणुकीसाठी रणनिती तयार केली आहे. यानुसार हिंदुत्वाचा मुद्दा मुंबईकरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न ठाकरेंचा राहणार आहे. हिंदुत्व सोडल्याच्या आरोपांवर योग्य तो प्रतिवाद केला जाणार, विधानसभेत शिवसेना UBTचा उमेदवार पिछाडीवर होता तिथं लक्ष केंद्रीत करणे, पक्ष सोडून गेलेल्या प्रभागात पर्यायी नेतृत्व उभं करणे, शाखाप्रमुखांना संघटनेकडून अधिक ताकद देणे, पक्षात नाराज असलेल्यांची नाराजी दूर करणे अशी रणनिती उद्धव ठाकरेंनी आखल्याचे समोर आल आहे.