#

Advertisement

Tuesday, December 10, 2024, December 10, 2024 WIB
Last Updated 2024-12-10T10:14:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारांवर गोपीचंद पडळकरांकडून एकेरी भाषेत टीका

Advertisement

सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरसमधल्या मारकडवाडी गावात आज महायुतीची सभा होत आहे. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले, अशी एकेरी भाषेत टीका गोपीचंद पडळकरने केली आहे.
नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते. मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कश्या होतात. त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते सांगावे, असं पडळकरने म्हटल आहे. जयंतराव पाटील हे सांगतात की, भाजपने 50 हजार मते आधीच सेट केले. त्यामुळे माझा विजय हा 61 हजार मतांनी झालाय पण प्रत्यक्षात ते 11 मतांनी जिंकले आहेत. शरद पवारांना मारकडवाडीचे आकर्षण का वाटतेय? कारण या देशातील जनता 2029 ला मोदींना पंतप्रधान करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षे मुख्यमंत्री केले हे यांचे दुखणे आहे, असं पडळकर मारकडवाडीत म्हणाले.