Advertisement
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मी तुमच्या हातातील काही लहान खेळणं आहे का? अशी संतप्त विचारणाही त्यांनी केली आहे. दरम्यान यावर आता उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. छगन भुजबळांबद्दल आपल्याला फार वाईट वाटलं असं त्यांना नागपूरमधील पत्रकार परिषदेत म्हटलं. तसंच भुजबळ अधुनमधून आपल्या संपर्कात असतात असाही खुलासा केला.
नाराज झालेलं कोणी संपर्कात आहे का? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, निरोप येत आहेत. त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती. अनुभव हाच उत्तम गुरु असतो. हा उत्तम गुरु त्यांना मिळाला आहे. त्यातून त्यांना शिकू द्या, सुधारे तर बघू. मला 2019 ला अनुभव मिळाला. भुजबळांनी अद्याप संपर्क केलेला नसला तरी ते अधूनमधून माझ्या संपर्कात असतात असा खुलासाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
अजित पवार मंत्रिमंडळ विस्तारानंतर नॉट रिचेबल असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांची ही जुनी सवय आहे, आता पहाटे कुठे आहेत बघा असं ते उपहासात्मकपणे म्हणाले.