#

Advertisement

Tuesday, December 3, 2024, December 03, 2024 WIB
Last Updated 2024-12-03T13:06:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांकडे अर्थ खातं ? राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री पदाचा पेच दिल्लीत अमित शहांसोबत बैठकीत सुटला आहे.  मुंबईहून अजित पवार हे दिल्लीसाठी रवाना झाले होते. त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती मंत्रिपद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आल्याने जास्तीच्या जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न आहेत. सध्या राष्ट्रवादीला ही केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकूण किती कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळतील याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्यांना कोणतं खातं मिळणार?

अजित पवार- अर्थ खाते

छगन भुजबळ- अन्न व नागरी पुरवठा

अनिल पाटील- आपत्ती व्यवस्थापन

अदिती तटकरे- महिला व बालकल्याण

हसन मुश्रीफ- वैद्यकिय शिक्षण खाते

धनंजय मुंडे- कृषी खाते

नरहरी झिरवळ, धर्मरावबाबा आत्राम आणि संजय बनसोडे यांच्यापैकी एकाला क्रिडा खाते मिळण्याची शक्यता

दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा