#

Advertisement

Wednesday, December 18, 2024, December 18, 2024 WIB
Last Updated 2024-12-18T11:25:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांविरोधात भुजबळ यांनी रणशिंग फुंकले

Advertisement

राज्यव्यापी दौरा करणार 
नाशिक : मंत्रिपदाच्या विस्तारानंतर अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ यांनी बुधवारी मोठा निर्णय जाहीर केला. छगन भुजबळ म्हणाले, गावागावातून, जिल्ह्यातून फोन येत आहे. भुजबळ साहेब या. ताकद वाढवा. होय खरे आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांनी यांनी हा निर्णय जाहीर केला. 
छगन भुजबळ म्हणाले की, आपल्याला व्होकल मंत्री हवे, व्होकल नेते पाहिजे. जे आमच्यासाठी बोलतील. ही आपली लढाई आहे. परत आवाज द्यायला सुरुवात झाली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून सभागृहामध्ये लढणार आहे. तिथे कितीही बंधने असली तरी रास्ता तो मेरा है, असा थेट इशारा छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना त्यांचे नाव न घेता दिला. 
भुजबळ म्हणाले, लोकसभेत मला नाशिक मतदार संघातून उभे करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी घेतला होता. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ते समजवणारही होते. परंतु तो निर्णय झाला नाही. त्यामुळे मी स्वत:हून माघार घेतली. त्यानंतर राज्यसभेत मला पाठवणार असल्याचे सांगितले. परंतु लोकसभा निवडणुकीत सुनेत्राताई यांचा पराभव झाल्यामुळे राज्यसभेत त्यांना पाठवण्याचा निर्णय झाला. त्यावेळी मी शांत राहिलो. मला विधानसभेचे तिकीट दिले. मी विपरीत परिस्थितीत विजयी झालो. आता मला म्हणतात, राज्यसभेत पाठवणार? पण विधानसभेत ज्यांनी जिवाचे रान करून मला निवडून आणले ते डोकी फोडून घेतील ना. त्यांना मी काय सांगणार? मतदारांना काय सांगणार?