Advertisement
हैदराबाद : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटामुळे अडचणीत सापडला आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रिमीयर शोवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनला शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
झुकेगा नही साला म्हणणाऱ्या पुष्पाला हैदराबाद पोलिसंनी झुकवलं आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता अल्लू अर्जूनचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली. या वेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणात अल्लू अर्जूनवर मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि 118 अंतर्गत चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता.अधिकची लोकप्रियता अंगाशी आली आणि डॅशिग सुपरस्टार अल्लू अर्जूला अटक झाली आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप
हैदराबादेत संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेत्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्याचे चाहते संतापले आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. अभिनेत्याच्या एका चाहत्यानं इंस्टाग्रामवर लिहिलं की, "नक्की याचा अर्थ काय? तो तिथे उपस्थित नव्हता. तर दुसऱ्यानं लिहिलं की, "क्रिकेट सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली तर तुम्ही विराट कोहलीला अटक कराल का? त्याचवेळी हे काही राजकीय गटाचं काम असू शकते, असंही काही चाहत्यांचं म्हणणं आहे. याशिवाय एकजण म्हणाला की, काय वेडेपणा आहे? चेंगराचेंगरी झाली तर, अभिनेता काय करणार? ही थिएटर मालकाची जबाबदारी आहे.