#

Advertisement

Friday, December 13, 2024, December 13, 2024 WIB
Last Updated 2024-12-13T12:14:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार ?

Advertisement


राष्ट्रवादीच्या खासदाराचं विधान 

नवी दिल्ली : शरद पवार यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार सहकुटुंब गेले होते. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, असं विधान आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं. त्यानंतर या चर्चांना बळ मिळालं. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी भाष्य केलं आहे. 
अमित शाह काल शरद पवार यांना भेटल्याच्या बातम्या माध्यमात आल्या. यावर अमर काळे यांनी भाष्य केलं आहे. काल शरद पवार यांचा वाढदिवस होता. आम्ही तिथे 7 तास सोबत होतो त्यामुळं तिथं अमित शाह भेट झाली नाही हे मी दाव्याने सांगतो. भेटीच्या चर्चा मीडियामध्ये सुरू आहेत.अशी भेट झाली या बातमीत काही तथ्य नाही. आमचा कुठलाही खासदार नॉट रिचेबाल नाही हे मी दाव्याने सांगतो.