#

Advertisement

Monday, December 16, 2024, December 16, 2024 WIB
Last Updated 2024-12-16T11:52:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त : ही रिक्त जागा कोणासाठी ?

Advertisement

डिसेंबरच्या शेवटी शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 43 जागांपैकी 42 जागांवर कोण मंत्री असतील हे निश्चित झालं आहे. मात्र मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून या जागेबद्दलचं गूढ कायम असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी ही रिक्त जागा कोणासाठी आहे याबद्दलचं थक्क करणारं विधान केलं आहे. अमोल मिटकरींनी व्यक्त केलेलं भाकित खरं असेल तर तो शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अमोल मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. अमोल मिटकरींनी, नाराजी कसली असेल? 41 आमदार निवडून आलेत राष्ट्रवादीचे. त्यापैकी 8 कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री असं असल्याने नाराजी होणं सहाजिक आहे. मला वाटत नाही कुठली नाराजी असेल. तुमच्याच माध्यमातून कळतंय की काही ओबीसी बांधव नाराज आहेत. तो पक्षाकडून राज्यसभेवर लवकरच जातील अशी माहिती तुमच्याकडूनच मिळाली. जर कोणाची नाराजी असेल तर पक्ष पातळीवर ती दूर करण्याचा प्रयत्न होतो. आमच्याच नाही तर भाजपामध्येही असे अनेक नेते आहेत. सुधीरभाऊंसारखे आहेत. शिंदे साहेबांच्या पक्षातील केसरकरांना शपथ घेता आली नाही. त्यामुळे नाराजी असणे सहाजिक आहे, असं उत्तर दिलं.
पुढे बोलताना मिटकरींनी, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन जी जी काही महामंडळं आहेत त्यावर जे जे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, नाराज आहेत त्यांची त्यावर बोळवण केली जाईल, असं वाटतं. तिन्ही पक्ष एकत्र येऊन पुढील पाच वर्ष टिकणारं सरकार चालवतील. नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मला वाटतं, असंही म्हटलं.