#

Advertisement

Thursday, December 19, 2024, December 19, 2024 WIB
Last Updated 2024-12-19T12:16:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राहुल गांधी ब्लू टीशर्टमध्ये तर प्रियंका गांधींनी नेसली निळी साडी

Advertisement

संसदेसह हिवाळी अधिवेशनात निळे वादळ 

दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सध्या जोरदार गोंधळाचे सत्र सुरू आहे. विरोधकांनी उद्योगपती अदानी मुद्यावरून केंद्र सरकारला घेरले आहे. तर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून विरोधक चांगलेच तापले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवर विरोधकांचा कालपासून हल्लाबोल सुरू झाला आहे. तर या वक्तव्याचा निषेध म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निळ्या रंगाचे कपड्यात संसदेत दाखल झाले.
संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात संसदेत अभूतपूर्व गोंधळ दिसला. सत्ताधारी आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या विधानानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. राजधानी दिल्लीतल्या संसद अधिवेशनात आणि महाराष्ट्रातल्या नागपूर अधिवेशनातही निळे वादळ आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निळ्या रंगाचा टीशर्ट घालून संसदेत दाखल झाले तर प्रियंका गांधी यांनी निळ्या रंगाची साडी नेसली आहे. निळा रंग हा आंबेडकर आणि दलित विचारांचे प्रतिक मानण्यात येते. नेमका तोच धागा पकडून आम्ही या समाजाचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचा संदेश दोघांनी दिला आहे.