Advertisement
मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला ; राजभवनवर लगबग
मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी सकाळी 11 वाजता किंवा सायंकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून रविवारी नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 12 आणि भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे.
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल अशी चर्चा होती. पण आता रविवारी हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. राजभवनावर त्याची तयारी सुरू आहे. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं नागपुरातही घडमोडींना वेग आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी चाळीस बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपाचे संभाव्य मंत्री
- चंद्रशेखर बावनकुळे
- चंद्रकांत पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- गिरीश महाजन
- रवींद्र चव्हाण
- प्रवीण दरेकर
- मंगलप्रभात लोढा
- बबनराव लोणीकर
- पंकजा मुंडे
- आशिष शेलार किंवा योगेश सागर
- संभाजी निलंगेकर
- जयकुमार रावल
- शिवेंद्रराजे भोसले
- नितेश राणे
- विजयकुमार गावित
- देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर
- राहुल कुल
- माधुरी मिसाळ
- संजय कुटे
- गोपीचंद पडळकर
शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेण्याची शक्यता
- दादा भुसे
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- गुलाबराव पाटील
- मंगेश कुडाळकर
- अर्जुन खोतकर
- भरत गोगावले
- संजय शिरसाट
- राजेश क्षीरसागर
- आशिष जैस्वाल
- प्रताप सरनाईक
- प्रकाश सुर्वे
- योगेश कदम
- बालाजी किणीकर
- प्रकाश आबिटकर
राष्ट्रवादीकडून बड्या नेत्यांची लॉबिंग
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं देण्यात येणार असून त्यामध्ये 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रिपदं असणार आहेत. त्यासाठी आता नेत्यांनी लॉबिंग सुरू केल्याचं चित्र आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. तर त्याआधी माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थिती असल्याची माहिती आहे.