Advertisement
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव
दिल्ली : आगामी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. नुकतंच शरद पवारांनी संमेलनाची तयारी आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
शरद पवारांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रुपरेषा कशी असणार याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीतील ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहणार आहेत. तर २५०० प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहेत, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार आहोत. मुख्य सभागृह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं नाव दिलं. लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रवेशद्वार राहणार असेल. या साहित्य संमेलनाला दिल्ली आणि महाराष्ट्रातील ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहतील. त्याशिवाय २५०० प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहे. १५०० लोकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे”, असे शरद पवार म्हणाले.