#

Advertisement

Tuesday, December 10, 2024, December 10, 2024 WIB
Last Updated 2024-12-10T10:24:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार यांचे नाव न घेता सदाभाऊ खोत यांची टीका

Advertisement

सोलापूर : रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात शरद पवार यांच्या शारिरिक व्यंगावर टीका केली होती. या विधानाची जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी सदाभाऊ खोत यांना अजित पवारांनी देखील समज दिली होती. अशातच आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे. खळं लुटणारा गावाकडे आला. त्यामुळे तुम्ही त्याला बरोबर गावाकडं आणलं. इंडियातील मोठा चोर राहुल गांधी पण येणार आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि राहुल गांधीवर नाव न घेता टीका केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात मागच्या काही दिवसांपासून राजकीय नेते भेट देत आहेत. पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे मॉक पोलिंग झालं नाही. त्यानंतर शरद पवार यांनी या गावात जात सभा घेतली. राहुल गांधी या गावातून ईव्हीएमविरोधात रॅली काढणार आहेत. तर भाजप आणि महायुतीकडूनही आज या गावात सभा घेण्यात येत आहे. या सभेत सदाभाऊ खोत बोलत होते. तेव्हा त्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.शरद पवारांनी आता शांत बसावं.पण यांना सत्ता गेल्यावर झोप लागत नाही. एखादा डाव पवारांनी टाकला तर पहेलवानाने नवा डाव टाकला असं म्हणतात. मात्र गेली 40 वर्षे यांनी डाव पहिले पण देवाभाऊ नावाचा वस्ताद मैदानात आला आहे. तेव्हा कळलं की हा पहेलवान नव्हता तर दुधी भोपळा होता. तुमची पोरगी 1 लाखाने निवडून आली. नातू रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.