Advertisement
नवी दिल्ली : माजी कृषी मंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. काल 17 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतरही या भेटीची मोठी चर्चा झाली होती.
आज 18 डिसेंबरला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. या भेटीदरम्यान शरद पवार साताऱ्यातील दोन शेतकऱ्यांना सोबत घेऊन गेले होते. या शेतकऱ्यांनी मोदींना त्यांच्या शेतातील डाळिंब भेट म्हणून दिली. राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या समुहासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. नुकतच शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिलं आहे. त्यानंतर आज शरद पवारांनी थेट मोदींची भेट घेतली.
दरम्यान, गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मोदी यांची झालेली बैठक खूप काही सांगून जात आहे.