#

Advertisement

Wednesday, December 4, 2024, December 04, 2024 WIB
Last Updated 2024-12-04T12:00:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार की नाही?

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सस्पेन्स अजून पूर्णपणे संपलेला नाही. महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना पत्र देत सरकार स्थापनेचा दावा केला. भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार या तीनही दिग्गज नेत्यांनी एकत्रितपणे राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर राज्यपालांनी महायुतीच्या तीनही नेत्यांना नव्या सरकारच्या शपथविधीसाठी वेळ दिला. या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तीनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने शिंदे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी राहणार की नाही? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
आताच आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिलेलं आहे. नियमानुसार, राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा सादर केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजचा शपथविधीची वेळ लिहून दिली आहे. आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे. या सगळ्यांच्या सहीचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेलं आहे.