#

Advertisement

Tuesday, December 3, 2024, December 03, 2024 WIB
Last Updated 2024-12-03T12:24:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार

Advertisement

मुंबई :  महाराष्ट्रातील या सर्वात गरीब आमदाराकडे फक्त   51 हजारांची संपत्ती आहे. या आमदाराने भाजपच्या तगड्या उमेदवाराचा दोनदा पराभव केला आहे.महाराष्ट्रातील या सर्वात गरीब आमदाराचे नाव आहे विनोद भिवा निकोले. विनोद भिवा निकोले हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार आहेत. विनोद भिवा निकोले यांनी  डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवणूक लढवली. विनोद निकोले 72114 मतांनी विजयी झाले आहेत. भाजप उमेदवार धनारे पास्कल जन्या यांचा त्यांनी परभव केला. धनारे पास्कर जन्या यांना 67407 मते मिळाली. 2019 साली निकोले यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली. निकोले हे भूमिहून आदिवासी मजूर कुटुंबातून येतात. 2019 मध्ये त्यांनी लोकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले उमेदवार प्रतिज्ञापत्र सादर करतात.  शपथपत्रानुसार निकोले यांच्याकडे घर, गाडी काहीही नव्हते. त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे नाही. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे फक्त 51 हजार 82 रुपयांची संपत्ती आहे. निकोले हे समाजसेवक आहेत.तर, त्यांच्या जोडीदार या शिक्षिका आहेत.