Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वसान महायुती सरकारने दिले आहे. हिवाळी अधिवेशानात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरुन एकवीसशे रुपये करु असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृत सांगितले. लाडकी बहिण या योजनेच्या निकषात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सरकार करणार असल्याची माहिती समोर आली होती. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे.ज्यांच्या घरी कार आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात येत होतं.जुलै 2024 पासून लाडकी बहिण योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. कोट्यावधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतला आहे.