#

Advertisement

Wednesday, December 18, 2024, December 18, 2024 WIB
Last Updated 2024-12-18T11:55:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार शनिवारी बीड दौर्‍यावर

Advertisement


मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार 

बीड : जिल्ह्यात केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तर मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात थेट उल्लेख केल्याने बीडच नाही तर राज्याचे राजकारण तापले आहे. पोलीसांच्या तपासावर सुरुवातीपासूनच कुटुंबिय आणि संघटनाचा आक्षेप आहे. आता शरद पवार सुद्धा बीड दौर्‍यावर येत आहे. शनिवारी 21 डिसेंबरला पवार हे मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. 

असा आहे पवारांचा दौरा
शरद पवार हे 21 तारखेला सकाळी मसजोग गावाला येणार आहेत. 20 तारखेला ते छत्रपती संभाजीनगर ला मुक्काम करणार आहेत. ते देशमुख कुटुंबाची भेट घेत सांत्वन करणार आहेत या खून प्रकरणाची पाळंमुळं कुठपर्यंत आहेत याचा शरद पवार आढावा घेणार आहेत, अशी माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली. बीड जिल्ह्यात बऱ्याच घटना घडल्या आहेत. खोलात जाऊन गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी यासाठी शरद पवार स्वतः तिथे जात आहेत.ही घटना खूप वाईट आहे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी शरद पवार बीडमधे येत आहेतय बीडमध्ये आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत, यात राजकीय हेतू अजिबात नाही, असे ते म्हणाले.

संतोष देशमुख खून प्रकरणी 7 आरोपी दाखवले आहेत, त्यातले 2 आरोपी पहिल्या दिवशी अटक केला होता मात्र त्याच्याकडून काय काय सामान जप्त केलं ते पोलिसांनी सांगितलं नाही. अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाला आज अटक झाल्याचं समजत आहे. आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे, आणखी 3 आरोपी फरार आहेत.