#

Advertisement

Tuesday, December 17, 2024, December 17, 2024 WIB
Last Updated 2024-12-17T11:45:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं?

Advertisement

मुंबई : राजकारणात कुणाचा तरी उदय कुणाचा तरी अस्त असतो. कोकणात राणे कुटुंबाचा पुनश्चः उदय झालाय. हाच उदय दीपक केसरकरांच्या राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ असल्याचं सांगण्यात येत आहे.दीपक केसरकरांचं मूळ राजकारणच राणे विरोधाच्या पायावर उभं राहिलं आहे. नारायण राणेंच्या होमग्राऊंडवर राणेंना थेट आव्हान देणारा नेता म्हणून दीपक केसरकरांना कायम बळ दिलं गेलं. मग ती राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या काळात दीपक केसरकरांना गृहराज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. नारायण राणेंचा मधला संघर्षाचा काळ संपला आहे.. नारायण राणे कोकणचे खासदार झाले. नितेश राणे राज्य सरकारमध्ये मंत्री आणि निलेश राणे आमदार...कोकण राणेमय होत असताना दीपक केसरकरांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देण्यात आला आहे. त्यामुळं राणेंच्या उदयासह दीपक केसरकरांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागल्याचं सांगण्यात येत आहे.
राणे आणि केसरकरांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दीपक केसरकर यांचं संपूर्ण राजकारण राणेविरोधी राहिलेलं आहे. शिवसेनेत असताना केसरकरांनी राजकीय दहशतवाद म्हणत कायमच राणेंना लक्ष्य केलेलं आहे. या वादाची सुरुवात सावंतवाडी नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदापासून सुरू झालेली आहे.

  • राणे-केसरकर संघर्ष फार जुना आहे
  • 2009 मध्ये पहिल्यांदा दीपक केसरकर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले होते
  • त्यावेळी शरद पवार यांनी नारायण राणे आणि केसरकर यांचा समेट घडवून आणला होता
  • यानंतर केसरकर पहिल्यादा सावंतवाडीतून आमदार म्हणून निवडून आले
  • मात्र दोघांमधील वाद कमी होत नव्हता
  • राणेंना टार्गेट करणारे केसरकर 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेले
  • उद्धव ठाकरेंनी राणेंविरोधात केसरकरांना बळ दिलं
  • केसरकर यांना गृहराज्यमंत्रीपद देऊन ठाकरेंनी त्यांची कोकणातली ताकद वाढवली
  • 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर राणेंच्या विरोधात बोलण्यास केसरकरांना खुल मैदान मिळालं