Advertisement
मुंबई : मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेनेत नाराजांची फौज उभी राहिलीय. विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोडेंकरांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय. केसरकर आणि सत्तार यांनीही आपली नाराजी लपवून ठेवलेली नाही. ही नाराजी एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजी आहे. मंत्रिपद न मिळाल्यान शिवसेनेतील मातब्बरांनी शिवसेना नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्यानं अनेक आमदार नाराज झाले आहेत. शिवसेनेतील नाराजी उफाळून आली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यासह आदिवासी आमदार राजेंद्र गावित, आमदार नरेंद्र भोंडेकर हे सुद्धा नाराज असल्याची माहिती आहे. नरेंद्र भोंडेकरांनी उपनेतेपद आणि विभागीय समन्वयपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेत पुढं-पुढं करणाऱ्यांना मंत्रिपदं दिल्याचा आरोप भोंडेकरांनी केला आहे.
विजय शिवतारेंनीही मंत्रिपद न मिळाल्यानं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.नाराजीमुळं त्यांनी तर थेट पुरंदरचा रस्ता धरला. तानाजी सावंतांनी तर मौनव्रत धारण केल आहे.तब्येत खराब असल्याचा खलिताच त्यांनी माध्यमांना धाडला आहे. शिवसेनेचे 6 आमदार आदिवासी आहेत पण त्यापैकी एकहीजण मंत्रिमंडळात का नाही असा सवाल राजेंद्र गावितांनी पक्षनेतृत्वाला विचारला आहे. प्रकाश सुर्वेंचा नाराजी लपवताना चेहरा रडवेला झाला होता.