Advertisement
नागपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुसऱ्या दिवशीही कामाजात सहभागी झालेले नाहीत. मागील 24 तासांपासून अजित पवार हे कोणालाही भेटलेले नाहीत. असं असतानाच अजित पवार कुठे आहेत याबद्दलची जोरदार चर्चा नागपूरबरोबरच महाराष्ट्रात रंगली आहे.
अजित पवार यांनी 5 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी अजित पवारांच्या पक्षातील 9 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व गोंधळादरम्यान अजित पवार हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवासानंतर दुसऱ्या दिवसाच्या कार्यवाहीमध्येही सहभागी झालेले नाहीत. मागील 24 तासांपासून अजित पवार कोणाला भेटलेले नाहीत. त्यामुळेच अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरु असतानाच अंजली दमानिया यांनी सूचक शब्दांमध्ये एक पोस्ट केली आहे. 'पुन्हा नॉट रिचेबल? वाह रे लोकशाही,' अशी पोस्ट केली आहे. दमानिया यांचा रोख अजित पवारांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.