Advertisement
एकनाथ शिंदे : जनतेची कामं केली
सातारा : होय मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. कॉमन मॅन म्हणून जनतेची कामं केली! पण कोणताही संभ्रम नको म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करताना भाजपाचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं एकनाथ शिंदेंनी आधीच स्पष्ट केल्याचं म्हटलं आहे.
तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी आहे. अनेकांकडून अशी मागणी होत आहे. याबद्दल काय ठरलं? असा प्रश्न शिंदेंनी ठाण्याला निघण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी, "सहाजिक आहे, मी जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं," असं म्हटलं आहे. पुढे बोलताना, "मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्ट नाही तर कॉमन मॅन! कॉमन मॅन बनून मी कॉमन मॅनच्या अडचणी, दु:ख समजून घेऊन सोडवण्याचा करण्याचा प्रयत्न केला. सहाजिक आहे लोकांची भावना," असंही शिंदे म्हणाले.