Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेतून ज्या दिवशी राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी माघार घेतली. त्याच दिवशी त्यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे हा नियतीचा खेळ की योगायोग, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील हे निवडून आले आहेत. सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रोहित पाटील यांचा शपथविधी नुकताच आठ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पार पडला. आणि हा शपथविधीचा दिवस रोहित आर. आर पाटलांसाठी महत्त्वाचा ठरला. कारण याच सभागृहातून आठ डिसेंबर 2014 रोजी स्वर्गीय आर. आर. पाटलांनी आपली प्रकृती ठीक नसल्याने काही दिवस सभागृहात अनुपस्थितीत राहण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं. मात्र, दुर्दैवाने त्यानंतर आबा सभागृहात पुन्हा कधीच गेले नाहीत.आणि काही महिन्यानाने आर आर पाटलांचं निधन झाले.त्यामुळे आठ डिसेंबर 2014 हा आर आर पाटलांसाठी विधानसभेचे शेवटचा दिवस,पण नेमकं त्याच दिवशी तब्बल दहा वर्षानंतर आर आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटलांच्या आमदारकीचा शपथविधी पार पडला, सात तारखेला खरंतर रोहित पाटलांचा शपथविधी होणार होता मात्र विरोधकांनी सभात्याग केल्याने त्या दिवशीचा शपथविधीचा दिवस टळला पण 8 डिसेंबर रोजी रोहित पाटलांनी आपली आमदारकीची शपथ घेतली.
राज्याच्या राजकारणातील हा भावूक क्षण असल्याचं बोललं जातंय. 8 डिसेंबर हाच तो दिवस होता ज्या दिवशी आर. आर पाटलांनी विधानसभेला अखेरचं निरोप दिला होता. आबांच्या या ८ डिसेंबर 2014 चा विधानसभा अध्यक्षांना लिहिलेले पत्र रोहित पाटलांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट केले आहे.