Advertisement
सोलापूर : मारकडवाडीपासून सुरु केलेला ईव्हीएमविरोधाची लढाई मविआनं दिल्लीपर्यंत नेण्याचा निर्धार केला आहे. एका बाजूला रस्त्यावरची लढाई आणि दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. काँग्रेस नेत्यांसोबतच "आप"च्या नेत्यांनाही सोबत घेऊन कायदेशीर लढाई लढण्याचा पवारांनी निश्चय केला आहे.
महाराष्ट्रातला ईव्हीएमविरोधातला लढा दिल्लीपर्यंत नेण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसनं कंबर कसली आहे. दिल्लीत शरद पवारांनी पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. ईव्हीएमविरोधात कायदेशीर पुरावे गोळा करणे आणि त्यानंतर न्यायालयीन लढा लढण्याची रणनिती शरद पवार आणि काँग्रेसची आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासाठीच दिल्ली गाठली आहे. निवडणूक आयोगानं एक निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन ज्या शंका आहेत त्या शंका दूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केली आहे.