Advertisement
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील तीन महिने महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झालं आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून माहिती मिळाली आहे. महापालिका निवडणुका घेण्यासाठी तीन महिन्याचा वेळ लागणार आहे. येत्या 22 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी निवडणुकीसाठी लागणार आहे. पालिकेत प्रभाग रचना, सदस्यांची संख्या यानुसार राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचा निर्णय घेणार आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टातील याचिका निकाली निघाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार आहे.