#

Advertisement

Thursday, December 19, 2024, December 19, 2024 WIB
Last Updated 2024-12-19T11:43:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न

Advertisement

मालेगावात भल्या पहाटे थरार 

मालेगाव : कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. भल्या पहाटेच हा प्रकार घडल्याने मालेगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली. देवदर्शनाहून येताना काही टवाळखोरांनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
गो तस्करी थांबवण्यासाठी अविष्कार भुसे यांनी प्रयत्न केल्याचे समजते. त्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केला आहे. त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 
मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसेंच्या वाहनावर टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. संशयित गो-तस्कर असल्याचे समोर येत आहे. पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे दिसून आले. देव दर्शनाहून परतत असताना हा प्रकार घडला. आयशर गाडीत जनावर चोरून नेत असल्याचा संशय आल्याने अविष्कार भुसे यांनी वाहनातून पाठलाग केला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केला आहे. त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारात अविष्कार भुसे यांनी केलेल्या धाडसामुळे गो-तस्करी थांबवण्यात यश आले असून काही गायींची देखील सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.