#

Advertisement

Tuesday, December 17, 2024, December 17, 2024 WIB
Last Updated 2024-12-17T17:49:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी गाठलं गाव

Advertisement

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या सत्ताधारी आमदारांची संख्या मोठी आहे. यावेळी सरकारकडं भक्कम बहुमत असल्यानं पक्ष सोडून जाईन असा इशारा किंवा धमकी देण्याचीही सोय नाही. त्यामुळं नागपुरात मंत्रिपद मिळण्याच्या आशेवर आलेले आमदार अधिवेशन सोडून आपापल्या घरी निघाले आहेत.
छगन भुजबळ नाशिकला परतले, तानाजी सावंत पुण्याला परतले,  विजय शिवतरे सासवडला परतले, रवी राणा अमरावतीला परतले तर प्रकाश सोळंके माजलगावला परतले आहेत. आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जाण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगितली आहेत. राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंनी तर आपण मतदारसंघात काही महत्वाची कामं असल्याचं कारण दिल आहे.
मंत्रिपद न मिळाल्यानं रुसलेल्या आमदारांच्या माघारीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. अधिवेशनाचा दिवसाचा खर्च 13 कोटी तर आमदारांच्या मुक्कामाचा खर्च पन्नास कोटी आहे. असं असताना मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न सभागृहात मांडण्याची संधी अधिवेशनात असते. पण जनहिताला दुय्यम स्थान देऊन मंत्री वैयक्तिक स्वार्थ साधत असल्याची टीका या निमित्तानं होऊ लागलीये. अधिवेशनाचा कालावधी पाहता गावी गेलेले नाराज आमदार परत येण्याची शक्यता कमीच आहे.