#

Advertisement

Monday, December 2, 2024, December 02, 2024 WIB
Last Updated 2024-12-02T12:35:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणूक ?

Advertisement

आज सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू

माळशिरस : मारकडवाडी गावात आज, सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत.  गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. मारकडवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं.
मारकडवाडीमध्ये मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली. यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
माळशिरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी तसे आदेश जाहीर केले आहेत. भारतीय न्याय संहितेचे कलम 163 नुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जर आदेशाचे भंग करून मतदान प्रक्रिया राबविली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मारकडवाडी गावाला पोलीस छावणीचं स्वरुप
बॅलेट पेपरवर उद्या मतदान प्रक्रिया राबवणाचा निर्णय घेतलेल्या माळशिरसमधील मारकडवाडी गावाला पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे. मात्र मतदान प्रक्रिया राबवू नये यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात आाल होता. प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर ग्रामस्थांनी बैठक घेतली. आता जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर मारकटवाडी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाल्याने परिस्थिती काहीशी तणावाची बनली आहे.

मतदान बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय
विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला.