Advertisement
मुंबई : महायुतीचं खातेवाटप ठरल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. येत्या २४ तासांत खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.तसेच, शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उद्या दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार आहेत.
गृहखाते भाजपकडेच राहणार
नगरविकास खातं शिवसेनेकडे
अजित पवारांकडं अर्थखाते
कसे असेल खाते वाटप ?
- गेल्या मंत्री मंडळातील महत्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार
- गृह भाजपकडे, तर नगरविकास शिवसेनेकडेच राहणार
- अजित पवार गटाला मिळणार अर्थ खातं
- महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार
- शिवसेनेचे उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार
- भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार