#

Advertisement

Wednesday, December 18, 2024, December 18, 2024 WIB
Last Updated 2024-12-18T11:04:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

...तुम्ही भाजपसोबत जा !

Advertisement

नाशिकमध्ये समर्थकांची मागणी 
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यातच आता छगन भुजबळांनी भाजपसोबत जावं, अवहेलना करणाऱ्या  पक्षात राहू नये अशी मागणी समर्थकांनी नाशिकच्या संघर्ष सभेत करण्यात आली आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
आपण अनेक मंत्रीपदावर काम केलं आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्रीपदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही अशी ग्वाही दिली, असं छगन भुजबळांनी सांगितलं आहे.