#

Advertisement

Monday, December 16, 2024, December 16, 2024 WIB
Last Updated 2024-12-16T12:04:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

होय, मी नाराज.., माहिती नाही मला...,कोण वरिष्ठ?

Advertisement


मंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड
नागपूर : राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. याबद्दल रविवारी रात्रीपासूनच नाशिकपासून ते राज्यातील अनेक भागांमध्ये ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी अगदी रस्त्यावर उतरुन नाराजी व्यक्त केली आहे. असं असतानाच आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी जाताना भुजबळ हे पत्रकारांवर चिडल्याचं दिसून आले . नागपूरमधील रेडिसन ब्लू हॉटेलमधून विधानसभेत जाण्यासाठी छगन भुजबळ बाहेर पडले असता पत्रकारांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. यावेळेस त्यांना तुम्ही नाराज असल्याचं समजतंय असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. मात्र बराच वेळ पत्रकार त्यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर अखेर भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना, "होय, मी नाराज," असं अशी तीन शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली. पुढे त्यांना, 'नाराजी दूर केली जाईल असं वाटतं का?' असा प्रश्न विचारला असता भुजबळांनी, 'माहिती नाही मला,' असं उत्तर दिलं. पुढे पत्रकारांनी काही अपेक्षा आहेत का तुमच्या? असं विचारलं असता भुजबळांनी, "काही अपेक्षा नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली. याचबरोबर भुजबळांना पत्रकाराने, "वरिष्ठांशी बोलणं झालं का?" असा प्रश्न विचारला असता भुजबळ चिडले. त्यांनी चिडूनच, 'कोण वरिष्ठ?' असा प्रतीप्रश्न पत्रकारांना केला आणि ते कारमध्ये जाऊन बसले.