#

Advertisement

Sunday, December 1, 2024, December 01, 2024 WIB
Last Updated 2024-12-01T18:14:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कुठेही न मागता भरभरुन मिळालेलं दान म्हणजे आई : ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement

मंगळवेढा : माझी आई माझ्या अस्तित्वाचा धागा होती. तिचे माझ्याविषयी असलेले प्रेम, त्याग हे माझ्या जीवनात असलेले अतुलनीय आधार होते. तिची पालनपोषण करणारी उपस्थिती ही जीवनातील वादळांमध्ये असलेला आरामाचा दिवा होता. तिच्या कोमल स्पर्शाने आणि सुखदायक शब्दांद्वारे, तिने माझ्या अस्तित्वाची जडणघडण, लवचिकता आणि करुणेच्या धाग्यांनी बांधली होती. तिच्या प्रेमाला सीमा नव्हती. माझी आई, तिच्या प्रेमळ शब्दांनी आणि अटळ पाठिंब्याने माझी सर्वात जवळची विश्वासू सहकारी होती. अर्थात सांगायचेच झालेच तर माझी आई ही माझी सर्वात जवळची मैत्रीण होती. कारण कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई,  असते असे प्रतिपादन बहुजन रयत परिषद महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी केले.

स्व. अनुराधा ढोबळे यांच्या जयंती निमित्ताने आयोजीत 

किर्तन कार्यक्रम प्रसंगी बोलत त्या बोलत होत्या.

ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, "आई माझी मायेचा सागर" या कीर्तनाचा आपण आनंद घेतल्यानंतर प्रत्येकाला आपली आई आठवल्या शिवाय राहणार नाही. कारण आपल्या जडणघडणीसाठी तिने घेतलेले कष्ट व कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्यासाठी केलेला त्याग या सर्व गोष्टी या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला आठवतील, निरपेक्ष भावनेने इतरांच्या जीवनामध्ये आनंद पेरणाऱ्या माझ्या आईने जीवनभर सत्याचीच सेवा करण्याचे काम केले. म्हणून आज माझ्या आईच्या जयंतीच्या निमित्ताने आपली ही उपस्थिती मला लाख मोलाची चाटते आहे. आम्हा भावंडावरती आईने केलेल्या संस्कारावरच आम्ही आज समाजकारणात व समाजात स्थिर आहोत. आयुष्याच्या चक्रव्यूहातून प्रवास करताना तिने दिलेले धडे, तिने रुजवलेले मूल्यं मी माझ्यासोबत घेऊन असते. तिचे प्रेम म्हणजे होकायंत्र आहे. जे मला माझ्या स्वप्नांच्या दिशेने निर्देशित करते. ती फक्त आई नव्हती तर ती माझे सर्वस्व होती. माझ्या अस्तित्वाचा सार होती. आम्ही बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून राज्यभर जे उपक्रम राबवतो त्या पाठीमागे माझ्या आईचीच प्रेरणा आहे. आईने आम्हाला घडवत असताना वडिलांना सुद्धा सातत्याने ४० वर्षे साथ देत खूप मोठी सेवा करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादनही शेवटी अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले.