Advertisement
खासदार संजय राऊत यांचा टोला
दिल्ली : सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी खातेवाटप झालं नसल्याच्या मुद्द्यावरुन, 'हे बिनखात्याचं सरकार आहे," असा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीसंदर्भात असलेल्या झिरो टॉलरन्सवरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी, मुख्यमंत्री यांच्याकडे कोणती खाती आहेत हे सांगू शकत नाहीत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे का? हे त्यांनाच माहीत नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तर सगळी बोंब आहे, असा खोचक टोला लगावला. 40 जणांनी काल शपथ घेतली. अधिवेशन सुरू आहे. कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची याची माहिती नाही की सगळी उत्तरं फडणवीस देणार आहेत? असा सवालही राऊत यांनी खातेवाटप न झाल्यावरुन विचारला आहे. "रवी राणा यांचं देखील मंत्रिपदासाठी नाव ऐकलं. ते देखील अमरावतीला गेले. जे आमच्याकडून गेले ते सत्ता, पद आणि पैशासाठी गेले हे स्पष्ट झालं, असंही राऊत म्हणाले.
राऊत यांनी फडणवीसांच्या गुन्हेगारीसंदर्भात झिरो टॉलरन्स भूमिका असल्याच्या विधानावरुन टोला लगावला आहे. "झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीस यांनी राज्यात राबवला तर 90 टक्के मंत्रिमंडळ खाली होईल," असं राऊत म्हणाले. मंत्रिमंडळामध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मंत्री असल्याचं राऊत यांना या विधानावरुन सूचित करायचं आहे.