Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीला मोठे बहुमत मिळून देखील दहा दिवस झाले तरी सरकार स्थापन झालेले नाही. आता अखेर महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळ्याची तारीख निश्चित झालेली आहे. गुरुवार ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात समारंभ होणार आहे. फक्त, सीएम आणि दोन डेप्युटी सीएम शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी खास या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या आधी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. भाजपाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठविले आहे.यांच्या उपस्थिती भाजपच्या विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड होणार आहे. त्यानंतर हे नावाची माहिती पक्षश्रेष्टींना दिली जाणार आहे. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
या आधी मुंबईत महायुतीच्या तीन्ही घटक पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी मिटींग घेतली जाणार आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावापासून ते मंत्रिमंडळातील सदस्यांच्या नावावर या बैठकीत सहमती घेतली जाणार आहे. परंतू एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बरी नसल्याने बैठका पुढे ढकल्यात येत आहेत. शिंदे यांच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यांना ताप आल्याने कमजोरी आली आहे. तसेच पांढऱ्या पेशींची संख्या देखील वाढलेली आहे. त्यांना घशाचा संसर्ग देखील झालेला आहे.