Advertisement
नागपुर : महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबरला नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी महायुतीचे 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचं त्यांच्या कोट्यातील काही जागा रिक्त ठेवणार? का अशी चर्चा आहे. दरम्यान शिवसेना कोट्यातील सगळी मंत्रिपदं भरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीही पहिल्याच विस्तारात कोटा पूर्ण करणार हा हे पाहावं लागणार आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळू शकतो. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रीपदासाठी मिळणार आहे. शिवसेनेच्या या अडीच-अडीच वर्षाच्या फॅार्मुलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रीपदाची संधी मिळणार असून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधीक आमदारांना मंत्री पदाची संधी देणारा फॅार्मुला असणार आहे.