Advertisement
मुंबई : विधानसभा निवडणूक प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकांना मोठी आश्वासनं दिलं होती. महाविकास आघाडीच्या आश्वासनास काऊंटर करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली होती. आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना देण्यात येणारा हप्ता 1500 वरुन 2100 करु , असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. दरम्यान, याबाबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.
महायुतीने या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. त्यामुळे आता महायुतीसमोर दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 45000 हजार कोटींचे बजेट ठेवले होते. आता यामध्ये वाढ करावी लागणार आहे. सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये कधी वाढणार. मी त्यांना म्हटलं, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. बजेटमध्ये वाढवायचं, रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. पुढच्या वर्षात निश्चितपणे वाढेल, इतकीच प्रतिक्रिया मी दिली. पण काही लोकांनी त्याचा विपर्यास केला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये करण्याचे आश्वासन भाजपच्या संकल्पपत्रात आहे. पैसे वाढवले नाहीत तर मी स्वत: पत्र लिहेन. मी आग्रह करेन, हे पैसे दिले पाहिजे. हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकल रीत सदा चले आये, प्राण जाये पर वचन न जाए, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.