#

Advertisement

Monday, December 2, 2024, December 02, 2024 WIB
Last Updated 2024-12-02T12:24:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 100 टक्के भाकरी फिरवणार

Advertisement

राज्य पातळीवरील जबाबदारी स्वीकारणार : रोहित पवार 
पुणे : शरद पवार गटात भाकरी फिरवण्याची शंभर टक्के वेळ आली आहे. माझ्यावर राज्य पातळीवरील जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारणार", असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाआहे. 
रोहित पवार म्हणाले,  मुख्यमंत्रिपद देवेन्द्र फडणवीस यांना मिळणार का माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे, त्या लोकनेत्या आहेत.  भाजपचा 88 टक्के शिंदे गटाचा 70 टक्के अजितदादा 69 टक्के स्ट्राईक रेट आहे.  10 टक्के मतं भाजपला ईव्हिएमवर मिळत होती, ती सेट करण्यात आली होती. ईव्हिएममध्ये जर सेट केलं नसतं तर महाविकास आघाडीचे 126 आमदार निवडून आले असते.  उत्तम जानकर यांच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहेत. मोहोळमध्ये काही लोकं लॅपटॉप घेऊन मतदान केंद्रावर फिरत होते असं सांगितलं जात आहे.  ईव्हीएम मशीन आम्हाला द्यावीत आम्ही त्यावर चौकशी करू, असं आव्हानही रोहित पवारांनी दिल आहे. 
रोहित पवार म्हणाले, पाथर्डीत आमचे उमेदवार निवडून येणार असं वाटतं होते.  या ज्या शंका आहेत, त्या पालिका निवडणूका होण्याआधी दूर झाल्या पाहिजेत. कोर्टाच्या भरतीत कंत्राटी भरती करणार असं समजतंय त्याला आमचा विरोध असणार आहे. लाडकी बहीण योजनेत काही अटी शर्थी टाकल्या जाणार, 2100 रुपये दिले जाणार का? यावर शंका आहे. आम्ही अधिवेशनाची वाट बघत आहोत. कालच्या बैठकीत मीच रोहित पाटलांचे नाव सुचवलं आहे,मला विरोधी पक्षात जी जबाबदारी मिळेल ती स्वीकरणार आहे.