#

Advertisement

Friday, November 29, 2024, November 29, 2024 WIB
Last Updated 2024-11-29T11:35:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी दिल्लीची विधानसभा निवडणूक लढविणार : अजित पवार

Advertisement

दिल्ली : विधानसभा निवडणूक निकालानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांनी ईव्हीएमवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच येत्या काळात भाकरी फिरवण्याचे संकेत देखील दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्लीची विधानसभा निवडणूक देखील लढवण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपल्या पार्टीचा देशभरात कसा विकास होईल, आपण अधिकाधिक जागा कशा जिंकू? महिलांना कशापद्धतीनं जास्तीत जास्त संधी देता येईल या सर्व विषयावर आम्ही चर्चा केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, डिसेंबरनंतर पक्षाचं एक राष्ट्रीय अधिवेशन देखील घेऊ. त्यामध्ये पक्षाला कसं पुढं न्यायचं, पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पक्ष व्हायचं आहे, त्यासाठी काय करावं लागणार? यावर चर्चा होईल. तसेच जे चांगलं काम करत आहेत त्यांना आणखी जास्तीत जास्त संधी देण्यात येईल, जी पक्षासाठी कामं करणारी जुनी लोक आहेत, त्यांची जबाबदारी तरुणांकडे सोपवण्यात येईल, ज्यामुळे पक्षात तरुणांची फळी निर्माण होईल. महिलांना देखील संधी देण्यात येईल, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षांतर्गत भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत.