Advertisement
वडीलांचे अभिनंदन करताना ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे प्रतिपादन
सोलापूर : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे सलग चारवेळा आमदार आणि सलग २० वर्ष विविध खात्याची मंत्रिपदं भूषविणारे वंचित बहुजन समाजाचे नेते. आपल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेचं जगणं समृध्द केलं. दीनदुबळ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व्यथा, वेदना जाणून त्यांच्या झोपडीत सुखाचा दिवा पेटविण्याचे काम साहेबांनी केलं. अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो ते त्यांच्या याच कार्यकर्तृत्वामुळं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेबांनी नेहमीच त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि लढायला बळ दिले, असे प्रतिपाद ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मणराव ढोबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या कन्या अड, कोमलताइ साळुंखे-ढोबळे अभिनंदन केले. याबाबत लक्षवेधी ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, जनतेचे प्रश्न सोडवायला शरद पवार साहेबांनीच ढोबळे साहेबांना मंत्रीपदं दिली. ढोबळे साहेबांनी गेली ५० वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय राहून लोकहिताला प्राधान्य दिले.
आता पुन्हा एकदा १० वर्षांच्या दुराव्यानंतर गुरु-शिष्य एकत्र आले आहेत. पक्ष प्रवेशानंतर पवार साहेबांनी आपल्या या विश्वासू शिष्यावर विधानसभा निवडणुकीची महत्वाची जबाबदारी टाकली आणि ढोबळे साहेब पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागले. गेल्या दहा दिवसांत झंझावती दौरे काढून त्यांनी मंगळवेढा, सांगोला, मोहोळ आणि माळशिरस हे चारही तालुके पिंजून काढत जनमत एकवटण्याचे काम सुरू केले. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून पवार साहेबांनी आपल्या या शिष्यावर आता आणखी मोठी जबाबदारी टाकली. पवार साहेबांनी ढोबळे साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली हा बहुमान ढोबळे साहेबांच्या कर्तृत्वाचा आहे. एखाद्या कर्तृत्वाचा मान राखावा तर असा, हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे, असेही ऍड. कोमलताई ढोबळे यांनी नमूद केले.