Advertisement
अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज
मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा झाल्याचे आरोप केले आहेत. इतकचं नाही तर महाराष्ट्रातील 22 पेक्षा जास्त उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा. तसेच ईव्हीएम घोटाळा झाल्याचे सिद्ध करून दाखवा असे आव्हानच अजित पवार यांनी विरोधकांना दिले आहे.
बाबा आढाव यांनी पुण्यात EVM विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी अजित पवारांनी विरोधकांनी चॅलेंज दिले. विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. EVM घोटाळा झाल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना दिले आहे.
आपलं मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसार बाबा आंदोलन करत आहेत. बाबांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी निवडणूक आयोग, कोर्ट यांच्याशी संबंधित आहेत. लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मावीआच्या 31 जागा आल्या. आमच्या 17 जागा आल्या. त्यावेळी कोणी काही म्हणाले नाही. बारामतीत माझ्या उमेदवार पराभूत झाल्या. जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे असे अजित पवार म्हणाले.