Advertisement
वर्धा : बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्षा अड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनीही जाहीरपणे बिनशर्त पाठिंब्याचे पत्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे दिले. त्यानंतर बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा बहुजन रयत परिषदेच्यावतीने महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आर्वी विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार सौ. मयुरी अमर कळे यांना पाठिंबा जाहीर केला. याबाबतचे पत्र खासदार अमरभाऊ काळे यांच्याकडे देतानावर्धा जिल्हा अध्यक्ष अजयभाऊ डोंगरे, उपाध्यक्ष किशोर वाघमारे, देवळी तालुकाध्यक्ष विनोद आमटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.