#

Advertisement

Wednesday, November 6, 2024, November 06, 2024 WIB
Last Updated 2024-11-06T11:38:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उपाध्यक्षपदी निवड होताच लक्ष्मणराव ढोबळेंवर अभिनंदनाचा वर्षाव

Advertisement

बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांकडूनही अभिनंदन 

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्ष पदी माजी मंत्री, ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी नियुक्ती करण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. याबाबतचे नियुक्ती पत्र ढोबळे यांना देण्यात आल्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ढोबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्णराव ढोबळे यांच्यावर प्रचाराची धुरा सोपविण्यात आली आहे. ढोबळे हे आपल्या भाषणांतून जुने-नवे दाखले देत विरोधकांवर टिकांचे तोफगोळे डागत असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ढोबळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवित त्यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे, याबाबतचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ढोबळे यांना दिले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत अभिनंदन केले.

दरम्यान, लक्ष्मणराव ढोबळे यांची महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर बहुजन रयत परिषदेच्या वतीने राज्यभरातील पराधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यावतीने अभिनंद केल्याचे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई साळुंंखे-ढोबळे यांनी सांगितले.