Advertisement
स्व. अनुराधाताई ढोबळे यांच्या जयंती निमित्त आयोजन
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सौभाग्यवती स्व. अनुराधाताई ढोबळे यांच्या जयंती निमित्त ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे आई माझी मायेचा सागर, या विषयावर सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिली.
शाहु शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन रयत परिषदेतर्फे सदर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार, ता. ३० नोव्हेंबर 202४ सायंकाळी 6:०० वाजता मंगळवेढा येथील शिशुविहार समोर, शाहु मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ मंगळवेढा मतदार संघातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ऍड. कोमलताई यांनी केले आहे. यावेळी महविकास आघाडीतील मान्यवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.