#

Advertisement

Monday, November 25, 2024, November 25, 2024 WIB
Last Updated 2024-11-25T11:06:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दिलीप वळसे पाटील शरद पवारांची भेट घेणार

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार दिलीप वळसे पाटील आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. कोणतीही राजकीय चर्चा करण्यासाठी नव्हे तर ही भेट नियमित बैठकीसाठी आहे असं वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी वळसे पाटील  मुंबईत आले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना पाडा असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं. त्यानंतर ही पहिलीच भेट असेल.
शरद पवार प्रमुख असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची मुंबईत बैठकर पर पडत आहे. दिलीप वळसे पाटील हे या संस्थेचे ट्रस्टी असून ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी शरद पवारांची ते भेट घेतील. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही, मात्र आपण शरद पवांरांची विचारपूस करू असं दिलीप वळसे पाटलांनी जाहीर केलं होतं.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत गेले. यामुळे पवारांसह अनेकांना धक्का बसल्याची चर्चा होती. त्यानंतरच्या विधानसभेला दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगावातून शरद पवार गटाचे देवदत्त निकम निवडणुकीला उभे होते. त्यावेळी वळसे पाटील यांचा गद्दार असा उल्लेख करून त्यांना पाडा असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं.