#

Advertisement

Friday, November 22, 2024, November 22, 2024 WIB
Last Updated 2024-11-22T11:37:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एस टी बसच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल

Advertisement

अहमदनगर : राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी आदर्श आचरसंहिता लागू करण्यात आली  तेव्हापासून स्थीर पथक आणि भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर रोकड व मौल्यवान वस्तू जप्त केल्या. निवडणूक काळात या पैशाचा व वस्तूंचा वापर केला जात होता, याबाबतचा तपासही करण्यात आला. तर, मतदानाच्या आदल्यादिवशीही अनेक मतदारसंघात नोटांचे बंडल पाहायला मिळाले. मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, आता चक्क धावत्या एसटी बसमधील शेवटच्या सीटखाली प्रवाशाला 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव येथील ही घटना असून एसटी आगार व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका युवकाने मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा जपत बसमधील वाहकाकडे नोटांचे हे दोन्ही बंडल सुपूर्द केले आहेत. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एस.टी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आहे. तसेच, ही रक्कम नेमकी कोणाची आहे, कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती, याचाही तपास करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मतदानच्या एक दिवस अगोदर, दोन दिवसांपूर्वी हीच बस स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. त्यानंतर काल याच बसने कोपरगाव -वैजापूर-कोपरगाव अशा फेऱ्या केल्या आहेत. काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना बसमधील एका विद्यार्थ्याला शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल सापडले आहेत. या दोन्ही बंडलमधील नोटांची बेरीज केली असता तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याचे पाहायला मिळत आहे.