Advertisement
निफाड : विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना एका एका मताला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. याच दरम्यान, बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व अधिक वाढले आहे. ढोबळे यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार बहुजन रयत परिषदेचे राज्यभरातील पदाधिकारी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश अध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. त्यानुसार निफाड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल अण्णा कदम यांना निफाड तालुका बहुजन रयत परिषद, समस्त मातंग समाज बांधवांनी जाहीर पाठींबा दिल्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे पत्र खासदार संजय राऊत यांना देण्यात आले. जाहीर पाठींबा पत्रावर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष साहेबराव शृंगार, उत्तर महाराष्ट्र संघटक ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा संघटक अमोल गारे, उपाध्यक्ष राहुल जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वेळी बहुजन रयत परिषद पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.