Advertisement
सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा
मुंबई : अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या 'टू द पॉईंट'मधील मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. महायुतीत सामील होण्यापूर्वी शरद पवारांना हटवलं. तसंच शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवल्याचं लपवून ठेवलं असाही दावा त्यांनी केला आहे.राष्ट्रवादी पक्ष फोडला नाहीतर ओरबाडला अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पक्ष सोडून जाणा-या प्रत्येकानं खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी मांडली.