#

Advertisement

Friday, November 22, 2024, November 22, 2024 WIB
Last Updated 2024-11-22T11:16:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शेअर मार्केटमध्ये तेजी : गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा

Advertisement

मुंबई : एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सोबतच, सट्टा बाजारात देखील महायुतीचं सरकार पुन्हा येणार असल्याने शेअर बाजारात तेजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीने देखील 571 अंकांची उसळी घेतलीआहे.  एकाच दिवसात  गुंतवणूकदारांना 7  लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. अदानींच्या ऊर्जेसंबंधित कंपन्यांचे समभाग सोडता इतर कंपन्यांच्या समभाग पुन्हा एकदा वधारले आहेत. अदानी पावर, अदानी ग्रीन, अदानी एनर्जी आणि अदानी विल्मारच्या समभागात घसरण सुरुच आहे.  अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्टच्या समभाग रिकव्हरी करत पुन्हा स्थिरावलेत.  जागतिक बाजारातील तेजी पाहायला मिळत आहे. 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ACC 3.81 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 2.40 टक्के, अदानी पोर्ट्स 2.54 टक्के, अंबुजा सिमेंट 3.60 टक्के मजबूत वाढीसह व्यवहार करत आहे.आयटी शेअर्समध्ये झालेली मजबूत वाढ आणि रिलायन्सच्या शेअरच्या किमतीमुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. BSE सेन्सेक्स 1574 अंकांच्या घसरणीसह 78,766 अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्स पुन्हा 78000 पार करण्यात यशस्वी झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही मोठी वाढ दिसून येत आहे आणि निफ्टी 50 निर्देशांक 472 अंकांच्या उसळीसह 23,829 अंकांवर व्यवहार करत आहे.
आजच्या व्यवहारात बँकिंग आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल आणि गॅस क्षेत्राचे शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही जोरदार वाढ दिसून येत आहे.