#

Advertisement

Tuesday, November 19, 2024, November 19, 2024 WIB
Last Updated 2024-11-19T17:15:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

लक्ष्मणराव ढोबळे यांनी घेतल्या 35 प्रचार सभा

Advertisement

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सर्वाधिक सभा घेणारे दुसरे नेते 

मंगळवेढा : भारतीय जनता पक्षातून स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात परतलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सोपविल्यानंतर तब्बल 13 उमेदवारांसाठी 35 प्रचार सभा घेत महाविकास आघाडी सरकारची भूमिका पटवून यशस्वी ठरले. भाषण करताना ते प्रमाण भाषेत कसे असावे, याची झलक पुन्हा एकदा प्रा. ढोबळे यांनी सर्वच नवख्या आणि जुन्या-जाणत्या नेत्यांनाही आखून दिली. केवळ टीका करून लोकांची वाहवाह करण्यापेक्षा शाब्दीक जवळीकही जपता येत असल्याचे त्यांच्या सर्वच सभांमध्ये जाणवले असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी अगदी जाहीरपणे मान्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत २०१५ मध्ये भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रांतिक सदस्य पदावर संधी देण्यात आली. परंतु. त्यांच्या साहित्यिक राजकीय भाषण शैलीला कुठेही संधी दिली गेली नाही. तसेच, महत्त्वपूर्ण निर्णयांतही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने भाजपमध्ये त्यांची घुसमट होत होती. सोलापूरात स्थानिक पातळीवरील राजकारणातही पोरासोरांच्या राजकीय पंक्तीत त्यांना बसविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ते भाजप मधून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, राजकीय स्थित्यंतरे होत असताना अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर एकाकी लढत देत असलेले शरद पवार यांना साथ-सोबत देण्याच्या दृष्टीने अनेक जुन्या शिलेदारांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याच कालावधीत पवार यांचे राजकीय शिष्य समजले जाणारे लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील घरवापसी केली. प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असताना ढोबळे यांच्या भाषणशैलीच्या जोरावर पवार यांनी त्यांना राजकीय संधी देत अनेक ठिकाणी मंत्रीपद व खादी महामंडळावर संधी दिली होती. यातून ढोबळे यांनी राज्यभर नावलौकिक मिळवला. ते फरडे वक्ते म्हणून परिचित असल्याने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केल्यावर काही दिवसांत त्यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. विधानसभा निवडणूक रंगात आलेली असतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या उमेदवाराच्या मतदार संघात प्रचाराच्या सभा घेण्याची जबाबदारी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर सोपविण्यात आली. त्या प्रचार सभेमध्ये ढोबळे यांनी अनेक ठिकाणी साहित्यिक,अनुभवी शैलीच्या माध्यमातून प्रचार घेत उपस्थित मतदारांकडून टाळ्या-शिट्ट्याचा घेत मोठा प्रभाव पाडल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या सभांना मागणी होऊ लागली. शरद पवार यांच्यानंतर पक्षात सर्वाधिक सभा घेणारे पदाधिकारी म्हणून लक्ष्मणराव ढोबळे यांचे नाव घेतले गेले. विधानसभेत पक्षाला मिळाणाऱ्या यशात ढोबळे यांच्या सभांचा वाटा मोठा असणार असल्याची चर्चा आहे.

या उमेदवारांसाठीच्या सभा (सभा संख्या)
महेश कोठे (सोलापूर शहर उत्तर 5), गणपत पाटील (शिरोळ- 3), अनिल सावंत (पंढरपूर-7), मदन कारंडे (इचलकरंजी-4), रोहित पाटील (तासगाव-2), जयंत पाटील (इस्लामपूर -2), पृथ्वीराज चव्हाण (कराड-2), उत्तमराव जानकर (माळशिरस-4), नारायण पाटील (करमाळा-2), अभिजीत पाटील (माढा-2), रोहित पवार (कर्जत-जामखेड), बाळासाहेब थोरात (संगमनेर), हर्षवर्धन पाटील (इंदापूर)