Advertisement
परळी : मंत्री धनंजय मुंडे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा परळी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांचा सामना असणार आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रात 5 अपत्यांचा उल्लेख केला आहे.
धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात पाच आपत्यांचा उल्लेख केला आहे. पहिल्यांदाच निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी शिवानी मुंडे आणि सीशिव मुंडे या दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र दिले होते त्यात या दोन अपत्यांचा उल्लेख नव्हता. कारण ते त्यांच्यावर अवलंबून नव्हते असं या शपथ पत्रावरून लक्षात येत आहे. शपथपत्रामध्ये शपथ पत्र देणाऱ्या व्यक्तींवरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचाच उल्लेख केला जातो. म्हणून आता शिवानी मुंडे आणि सिशिव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.
धनंजय मुंडे यांनी उल्लेख केलेल्या अपत्यांची नावे : 1. शिवानी मुंडे, 2. सीशिव मुंडे , 3. वैष्णवी मुंडे, 4. जानवी मुंडे
5. आदीश्री मुंडे